आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतील अंतर्गत वादात कामे रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी समितीने मंजूर केलेल्या अग्निशामक साहित्य खरेदीला महासभेने ब्रेक लावला असताना एलईडी बसवण्यासाठी ठेकेदाराची मुदत संपल्याचे कारण देत हे काम रद्द करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास करण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले. एलईडीवरून यापूर्वी सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घेरले होते. आता मनसेनेही शिवसेना व भाजपच्या मदतीने वादग्रस्त एलईडीच्या कामाला हात घातल्यामुळे अंतर्गत वाद चिघळल्याचे चित्र दिसत आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत प्रा. कुणाल वाघ यांनी एलईडी विषयाला हात घातला. एलईडीचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारास ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात फिटिंग बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र तसे न झाल्याने हे कंत्राट रद्द करावे व त्यासाठी न्यायालयीन आक्षेपांचा अभ्यास करावा, अशी सूचना केली. वंदना बिरारी यांनी विद्युत विभागाकडून पथदीपांची कामे बंद असल्याचा आरोप केला. सचिन मराठे यांनी दोन वर्षापासून एलईडीचा विषय दोन वषापासून भिजत पडला असून, जर एलईडीची फिटिंग बसणार नसेल तर, तात्काळ न्यायालयीन प्रक्रिया तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. शाेभा आवारे, रंजना भानसी यांनीही एलईडी बसवणार नसाल तर विद्युत विभागाकडून खरेदी कशासाठी असा सवाल केला. त्यानंतर एलईडीसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया तपासून फेरनिविदेबाबत निर्णय घ्यावा असे आदेश ढिकले यांनी दिले.
विधानसभेच्या तोंडावर धोक्याची घंटी
अिग्नशामक सहित्य खरेदीला स्थायीने मंजुरी दिली असताना महासभेत महापाैर अॅड. यतिन वाघ यांनी आमदार वसंत गिते यांच्या पत्राच्या संदर्भात फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, हे पत्र अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी उपििस्थत केले. दरम्यान, तहकूब महासभेवर त्यानंतरच्या तारखेला आलेले पत्र घेता येत नाही, असाही आक्षेप स्थायीकडून घेण्याची तयारी तसेच एलईडी कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मनसेतील कुरबुरी लपून राहिलेल्या नाहीत.