आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाडी सोडून द्या, आम्ही नाका पार करवून देऊ : गिते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘टोलनाक्यावर कोणीही टोल भरू नये. जर तेथील कर्मचार्‍यांनी अडवले तर गाडी रस्त्यातच लावून बाजूला व्हा, तुमची गाडी नाका पार करून देण्याची जबाबदार मनसेची,’ असे आवाहन मनसे आमदार वसंत गिते यांनी वाहनचालकांना केले आहे.

राज यांनी 12 फेब्रुवारीला टोलविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईतील सभेत राज यांनी टोलमधील गोंधळाकडे लक्ष वेधल्यावर राज्यभरात तोडफोड झाली. त्या वेळीही टोल भरू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. टोल न भरण्याचा आग्रह धरल्यानंतर वाहनचालकांना बळ देण्यासाठी कार्यकर्ते धावले नाही. पोलिस बंदोबस्तामुळे नागरिकांना टोल भरणे अपरिहार्य ठरले. ही तक्रार लक्षात घेऊन 12 जानेवारीला कार्यकर्ते आता मोठय़ा संख्येने नाक्याजवळ थांबणार आहेत.