आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, गुरुवारी शिवबंधनात अडकण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधारी मनसेचे तब्बल २५ नगरसेवक पक्षाला साेडून जात असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली असून, गुरुवारी मनसेचे चार नगरसेवक शिवसेनावासी हाेणार असल्याची चर्चा अाहे. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांचा अाकडा १५ इतका हाेणार अाहे.

महापालिकेत सत्ताधारी मनसेचे पाच वर्षांपूर्वी ४० नगरसेवक हाेते. पक्षाचे तीन अामदारही हाेते, मात्र गेल्या दाेन वर्षांत मनसेला पडलेल्या खिंडारानंतर याेग्य ती बांधबंदिस्ती करण्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अालेले अपयश, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाटेत भाजपचे निर्माण झालेले वारे अादीमुळे पिछेहाट हाेत गेली. खासकरून महापालिका निवडणूक ताेंडावर अाल्यानंतर पक्षाचे गळतीसत्र थांबता थांबण्याची चिन्हे नाहीत. खुद्द राज यांनीही त्याकडे दुर्लक्ष करीत 'उडाले ते कावळे' याप्रमाणे नगरसेवकांची चिंता साेडून संघटनेकडे लक्ष केंद्रित केले अाहे. ते बघून पक्षातील नगरसेवक स्वत:च्या सुरक्षेसाठी शिवसेना भाजपचा अाधार घेताना दिसत अाहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम काेंबडे यांनी गेल्या अाठवड्यात भाजपत प्रवेश केला. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १९ इतकी झाली हाेती. अाता पुन्हा चार नगरसेवक शिवसेनेत जाण्याची चिन्हे असल्यामुळे मनसेने त्यांना धक्का देण्यासाठी युक्तीचा शाेध सुरू केला अाहे. यातील तीन महिला नगरसेविकांचा समावेश असून, एका नगरसेवकाकडे सध्या एक माेठे पदही अाहे. दाेन नगरसेविका सिडकाेतील तर एक नगरसेविका नाशिकराेडमधील असल्याचे बाेलले जाते. नगरसेवक मात्र पंचवटीतील असल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...