आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात मनसेचा गनिमी कावा; 750 कार्यकर्त्यांना अटक, पोलिसांकडून लाठीमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केल्यानंतर बुधवारी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर गनिमी काव्याने उतरून मनसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यात 750 कार्यकर्त्यांना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांच्या काठीचा ‘प्रसाद’ खावा लागला.

जिल्ह्यातील वाडीवर्‍हे, विल्होळीजवळ आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत निदर्शने केली. फोटोसेशन झाल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मात्र त्याचवेळी काहींनी चक्का जाम केला, वाहनांची हवा सोडली. दिंडोरी, चांदवड, मालेगाव तसेच नाशिक-पुणे महामार्गावरही आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मनसे आमदार उत्तमराव ढिकले यांना पोलिसांनी घरीच अटक केली, तर महामार्गावर आंदोलनाचे आदेश असताना आमदार नितीन भोसले यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोरील उड्डाणपुलाजवळ दुपारी आंदोलन केले. तेथे त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

आंदोलनात सहभागी झालेल्या 215 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील 140 कार्यकर्त्यांची अटक व सुटका करण्यात आली. 180 कार्यकर्त्यावर जमावबंदी व कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक व सुटका करण्यात आली. सात जणांविरोधात गुन्हाही दाखल केला. कोणतीही दगडफेक वा नासधूस झाली नसल्याचा दावा पोलिस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी केला.