आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS On Road On The Issue About 'MUKANE' In Nashik

‘मुकणे’प्रश्नी मनसे अाक्रमक पवित्र्यात, महासभेत ठेवणार प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुकणेधरणातून नाशिक शहराच्या भविष्यकालीन पाणीपुरवठ्याकरिता २७० काेटी रुपये खर्च असलेली प्रस्तावित पाणीपुरवठा याेजना मंजुरीसाठी अाता मनसेने कंबर कसली अाहे. शिवसेना भाजपकडून स्थगितीपासून तर अन्य अडथळे निर्माण करण्याच्या राजकारणात भविष्यातील पाणीप्रश्न कसा गहन हाेणार, या मुद्यावरून मनसे नगरसेवक येत्या महासभेत अाक्रमक हाेणार अाहेत.

केंद्राच्या नेहरू पुनरुत्थान अभियानांतर्गत मुकणे धरणातून भविष्यकालीन पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने याेजना प्रस्तावित करण्यात अाली. त्यासाठी २२० काेटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले. मात्र, निविदा अन्य कामात विलंब झाल्याने अंदाजपत्रक फुगले. या कामासाठी सर्वात कमी दराची निविदा असलेल्या एल अॅण्ड टी कंपनीने २७० काेटींपासून तर २९४ काेटींपर्यंत कामाचा अाकडा बदलला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत गाेडसे, अामदार बाळासाहेब सानप, तत्कालीन विराेधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, गटनेता अजय बाेरस्ते यांनी मुकणे धरण याेजनेच्या वाढीव अंदाजपत्रकाचा पालिकेला ५० काेटींपर्यंत बसणारा फटका निविदा अटीतील तांत्रिक मुद्यावरून प्रशासनाला घेरले. महासभेत मुकणेचा प्रस्ताव मंजुरीसाठी असताना सानप यांच्या तक्रारीवरून नगरविकास राज्यमंत्र्यांनी कामास स्थगिती िदली.
त्यानंतर तीन महिने या मुद्याचे घाेंगडे भिजत पडले हाेते. त्यात एल अॅण्ड टीने कामात दिरंगाई हाेत असल्याचे पत्र पाठवत ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय कळवल्यास काम साेडण्याचा इशारा दिला हाेता. दुसरीकडे मुकणेवरून शिवसेनेने स्थानिक पातळीवरील अाक्रमक भूमिका कायम ठेवली अाहे.

पाणीटंचाईची ढाल...
सध्याशहरात २० टक्के पाणीकपात सुरू असून, येत्या काळात पाण्याचा मुद्दा चांगलाच पेटणार अाहे. गंगापूर धरणातील पाण्यावर नगरबराेबरच मराठवाड्याकडून दावा केला जात अाहे. अशा स्थितीत भविष्यात मुकणे पाणीपुरवठा याेजना झाली तर सिडकाे, सातपूर, इंदिरानगर, गंगापूरराेड, पंचवटीतील पाणीप्रश्न कसा सुटेल, याबाबत मनसे नगरसेवकांकडून जागृती केली जाणार अाहे. केंद्राची नेहरू नागरी पुनरुत्थान याेजना बंद झाली असून, सद्यस्थितीत काम बंद पाडले तर अायता मिळणारा दीडशे काेटींचा निधीही कसा हातातून जाईल, याकडे लक्ष वेधले जाणार अाहे.