आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेने पाजले काेटी २५ लाख लिटर पाणी, संकटमाेचकाची बजावली भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या सत्तेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर नाशिक शहरावर अालेल्या ३० टक्के पाणीकपातीच्या टंचाईच्या काळात तब्बल काेटी २५ लाख लिटर पाणी नाशिककरांना पाजल्याचा दावा केला असून, केवळ टीका करून राजकीय भांडवल करण्यापेक्षा संकटमाेचकाची भूमिका बजावल्याचेही प्रत्यक्ष दाखवून दिले अाहे.
मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे नाशिकवर इतिहासात प्रथमच माेठ्या प्रमाणावर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ अाली. भाजपचे पालकमंत्री अामदार या दाेघांनी गंगापूर धरणातून पाणी सोडले जात असताना ठाेस भूमिका घेतल्यामुळे सर्वपक्षीयांनी अाक्रमक पवित्रा घेत काेंडीत पकडले. त्यात शिवसेनेबराेबरच मनसेही हिरिरीने पुढे हाेती. मनसेने शहरात माेर्चा काढूनही भाजपचा निषेध केला हाेता. मात्र, राजकीय अाराेपाद्वारे पाणी तापवण्यापेक्षा नाशिककरांना दिलासा कसा मिळेल, यादृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्ग काढण्याचे अावाहन केले हाेते.

त्यानुसार संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, महापाैर अशाेक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सचिन भाेसले, डाॅ. प्रदीप पवार यांनी एकत्रित नियाेजन करत शहरासाठी १० टँकर उपलब्ध करून दिले. मार्चला धडाक्यात उद््घाटन करून मागेल त्याला माेफत पाण्याचा उपक्रम सुरू झाला. फाेन केल्यानंतर संबंधित साेसायटीत जाऊन मनसेने टाकीत पाणी भरून देण्याची कामगिरी पार पाडली. मेअखेरपर्यंत पाणीवाटप केल्यानंतर मनसेने घेतलेल्या अाढाव्यात अाता काेटी २५ लाख लिटर पाणी वितरित केल्याचे पुढे अाले अाहे. त्यासाठी १० टँकरच्या माध्यमातून तब्बल हजार १५२ फेऱ्याही मारण्यात अाल्या. मेनंतर मनसेचे १० टँकर बंद झाले असले तरी अाजघडीला नगरसेवक गणेश चव्हाण, मीना माळाेदे, सलीम शेख, अनिल मटाले यांचे वैयक्तिक टँकर मात्र सुरू अाहेत.

शेख यांचा भाईचारा
नेहमीच सामाजिक उपक्रमांना हात देणाऱ्या स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी टंचाईच्या काळात धर्माचा भेदभाव करता पाणीवाटपाची जबाबदारी पार पाडली. यापूर्वी गायींच्या दुखऱ्या खुरांवर उपचार करणे, गरिबांसाठी १० रुपयांत पुरीभाजी पुरवण्याचा उपक्रम करणाऱ्या शेख यांनी रामकुंडात धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांच्या स्नानविधीसाठी स्वतःचा टँकर सुरू ठेवला अाहे. अलीकडेच संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनाही टँकरद्वारे माेफत पाणी पुरवले होते.

नाशिककरांची मनसे सेवा पार पाडतोय
^राजठाकरे यांच्या अादेशानुसार अाराेप करण्यापेक्षा नाशिककरांची मनसे सेवा करण्याची जबाबदारी पक्षाने चांगल्या पद्धतीने पार पाडली. यापुढेही संकटसमयी मनसे नाशिककरांच्या सेवेसाठी तत्परतेने पुढे येईल. -संदीप लेनकर, प्रवक्ता, मनसे.
बातम्या आणखी आहेत...