आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Secretary Atul Chandak Arrested, Action Took On Comment Of Non Maharashtrian

मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना अटक,परप्रांतीयांविरोधात पत्रक काढल्याने कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना सातपूर पोलिसांनी बुधवारी रात्री साडे आठ वाजता अटक केली. साडेचार वर्षांपूर्वी परप्रांतियांना नोकरी न देण्याबाबत केलेल्या पत्रकबाजीवरून ही कारवाई होताच प्रचंड खळबळ उडाली. चांडक यांच्या अटकेनंतर मनसे पदाधिकार्‍यांनी आक्रमक होत पोलिसांवर दबाव असल्याचे सांगत यामागे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच हात असल्याचा आरोप केला.
चांडक यांच्याकडे रात्री साडे आठच्या सुमारास सातपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ हे पथकासह आले. त्यांनी 30 सप्टेंबर 2009 रोजी सातपूर पोलिस ठाण्यात कलम 153 अन्वये दाखल गुन्ह्याचा संदर्भ देत चांडक यांना अटक केली व पोलिस ठाण्यात नेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केली. याबाबतची माहिती कळताच मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते, महापौर अँड. यतीन वाघ यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी पोलिस ठाण्यात जमले. मोठय़ा प्रमाणात कार्यकर्तेही जमा झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर चांडक यांना वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सातपूरमध्ये एक पत्रक प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रकाशक म्हणून आमदार नितीन भोसले, अतुल चांडक, हेमंत दीक्षित, यांचे नाव होते. त्यात परप्रांतियांना नोकरी न देण्याचे आवाहन करणारार लोकांच्या भावना भडकवणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचा आक्षेप घेवून 30 सप्टेंबर 2009 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
साडेचार वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘त्या’ पत्रकाशी आपला संबंध नव्हता. तसा जबाब यापूर्वीच दिला आहे. पोलिसांना प्रत्येक वेळी सहकार्यही केले. मात्र अचानक अटक करणे धक्कादायक आहे. अतुल चांडक, प्रदेश सरचिटणीस, मनसे.