Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Mns Warning To Shopkeepers About Marathi Hordings

मनसेचा खळखट्याक आंदोलनाचा इशारा, मराठी पाट्या लावण्याचा दुकानदारांना अाग्रह

प्रतिनिधी | Aug 04, 2017, 08:13 AM IST

  • मनसेचा खळखट्याक आंदोलनाचा इशारा, मराठी पाट्या लावण्याचा दुकानदारांना अाग्रह
सिडको-मनसेने पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हातात घेतला आहे. अनेक दिवसांपासून शांत असलेल्या मनसे सैनिकांनी दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी दुकानदारांना डेड लाईन देण्यात आली असून दुकानांवर मराठीच पाट्या असल्या पाहिजेत याबाबत अनेक दुकानदारांना निवेदन सूचना दिल्या आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत नाशिक मध्ये महापालिकेची सत्ता काबीज केली होती. आता पुनः तोच मुद्दा घेऊन मनसे मैदानात उतरली आहे. याची सुरवात दुकानाच्या मराठी पाट्यांवरून केली जात आहे. मनसे च्या वतीने सिडको, सिटी सेंटर मॉल शहरातील अनेक ठिकाणी मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांना सूचना निवदेन दिले आहे. तत्काळ या ठिकाणी मराठी पाट्या लावल्या जाव्यात अन्यथा दुकानांसमोर खळखट्याक आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा नवीन नाशिक विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष संदेश जगताप यांनी दिला आहे.
२० दिवसांची मुदत
आम्ही २० दिवसांची मुदत देत आहोत. या काळात दुकानांवरील पाट्या या मराठीच लावायला हव्यात. मराठीचा अभिमान असलाच पाहिजे.
- संदेश जगताप, अध्यक्ष, मनसे विद्यार्थी सेना.

Next Article

Recommended