आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे दोन नगरसेवक गायब झाल्याचा संशय, महापौरपदाच्या इच्छुकांची घालमेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एक-एक नगरसेवक महत्त्वाचा असताना, मंगळवारी (दि. २) शिवसेनेने मनसे व काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक पळवल्याचे वृत्त आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. मनसे आमदार वसंत गिते यांनी सर्व नगरसेवकांना राजगड येथे पाचारण करून हजेरीही घेतली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही नगरसेवकांशी संपर्क झालेला नव्हता.
शिवसेनेतील वजनदार इच्छुकांनी संख्याबळ जमवण्यासाठी जोर लावल्यामुळे 'रात्र वै-याची' अशी स्थिती मनसेची झाली आहे. त्यातूनच मंगळवारी दुपारी चार नगरसेवक शिवसेनेच्या काही नेत्यांनी गायब केल्याची बातमी पसरली. त्यात खासकरून मनसे नेत्यांची धावपळ सुरू झाली. 'राजगडह' येथे गिते यांनी सर्व नगरसेवकांना हजर राहण्याचे फर्मान दिले. राजसाहेबांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याचे कारण सांगितले जात होते, मात्र पळवापळवीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. सभागृहनेते शशिकांत जाधव यांनीही माध्यमांची पत्रकार परिषद सोडून राजगडाकडे धाव घेतली. तत्पूर्वी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, गटनेते अशोक सातभाई दाखल झालेले होते. तुलनेत काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता होती.
अपक्षांचीही धावपळ : सभागृहनेत्यांनी गटनेत्यांसमवेत आयुक्तांची भेट घेण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात दुपारी नगरसेवक पळवापळवीचे वृत्त आल्याने व त्यात अपक्ष असल्याची अफवा पसरल्याने अपक्ष आघाडी गटनेत्यांनाही जमवाजमव करावी लागल्याचे समजते.
सहलीसाठी आज बैठक
शिवसेनेकडून नगरसेवक फोडले जाण्याची भीती लक्षात घेत मनसे नगरसेवकांना सहलीस नेण्याबाबत बुधवारी निर्णय होणे शक्य आहे. दरम्यान, एका महिला नगरसेविकेने महालक्ष्मी दर्शनासाठी बाहेर असल्याचे तर एक नगरसेवक कामानििमत्त बाहेर असल्याचे उत्तर कुटुंबीयांनी मनसे नेत्यांना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.