आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरला माेबाइल चाेरांची टाेळी जेरबंद; अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मोबाइलचोरी करणारी मोठी टोळी जेरबंद करण्यास अंबड पोलिसांना यश आले आहे. प्रथमच मोबाइल खेचणारी टोळी पकडण्यात आली आहे. या टोळीकडून लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत करण्यात आले अाहेत. संशयित टोळीतील सदस्य मोबाइलवर बोलत चालणाऱ्यांवर पाळत ठेवत मोबाइल चाेरी करत हाेते. 
 
शहरातील विविध भागात मोबाइल चाेरीच्या घटना घडत हाेत्या. अंबड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. अंबड लिंकरोड परिसरात पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाइल चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. या माहितीच्या अाधारे अंबड लिंकरोडवर सापळा रचण्यात अाला. पाेलिसांना एका दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल चुना लावलेला अाढळला. या दुचाकीचा पाठलाग करून दोन संशयितास पकडण्यात आले.
 
चौकशीमध्ये गोपाळ जगन्नाथ पाटील, सागर दिलीप वाघ (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) अशी नावे त्यांनी सांगितले. चौकशीत पायी जाणाऱ्या इसमांच्या हातातील मोबाइल चोरी करत असल्याचीमाहिती दिली. अधिक चौकशीत कुणाल विशाल सूर्यवंशी याच्याही नावाचे निष्पन्न झाले. पथकाने संशयिताच्या घराची झडती घेतली असता एक स्पोर्ट बाइक, विविध कंपनीचे महागडे मोबाइल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. वरिष्ठ निरीक्षक कड, दत्तात्रेय विसे, शंकर काळे, चंद्रकांत गवळी, अवी देवरे, मनोहर कोळी, विपुल गायकवाड यांच्याय पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून मोबाइल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार अाहेत. प्रथमच मोबाइल चोरी करणारी टोळी जेरबंद करणाऱ्या पथकाचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी अभिनंदन केले. 

आणखी गुन्हे उघडकीस येणार 
मोबाइल चोरी करणाऱ्या टाेळीकडून मोबाइल चोरीसह सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. संशयित पायी जाणाऱ्यांना लक्ष्य करत मोबाइल चोरी करत होती. तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. -मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे. 
बातम्या आणखी आहेत...