आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको, सातपूरला पोलिसांचे संचलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको, सातपूर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांच्या वतीने सिडको परिसरातून संचलन करण्यात आले. एसआरपी, कमांडो, होमगार्ड, आरसीपी आदींसह सर्व पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी पोलिसांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
गणेशाेत्सवाला अाता रंग भरू लागले असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. शुक्रवारी सिडकोतील उत्तमनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, पवननगर आदींसह संपूर्ण परिसरात पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संचलन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी संजय बांबळे, रवींद्र सहारे, विवेक बैरागी, एस. बी. खडके, वैशाली शिंदे, जयेश गांगुर्डे, बापू देव, सचिन सुपले आदी उपस्थित होते.

सातपूरला सशस्त्र संचलन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी सातपूर भागात मिरवणूक मार्गावर सकाळी १० वाजता सशस्त्र संचलन केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर भागात यंदा मोठ्या प्रमाणात ९२ मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत अाहे.

सातपूर भागात तीन मौल्यवान गणपती मंडळ असून, सातपूर औद्याेगिक वसाहतीतही छाेट्या कंपन्यांत गणेशाेत्सव साजरा करण्यात येतो. परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी, समाजकंटकांवर वचक बसावा यासाठी पोलिसांच्या वतीने स्वारबाबानगर, राजवाडा, निगळ गल्ली, शिवाजी चौक, सातपूर मेनरोड, टाऊन पोलिस चौकी या मिरवणूक मार्गावर सकाळी १० वाजता संचलन करण्यात अाले. या संचलानात पाेलिसांसह सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे, सहायक निरीक्षक जगन्नाथ गायकवाड, माधवी वाघ, अशाेक पवार आदींसह या वेळी दंगल नियंत्रण पथक, स्टांकिग फोर्स, नियंत्रण कक्ष कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...