आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Code Of Conduct News In Marathi , Government Website, Divya Marathi

सरकारी वेबसाइटवरील चमकोगिरी बंद,आचारसंहितेच्या बडग्याने वेबसाइटची ‘साफसफाई’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एका सपाट्यात होर्डिंग्ज हटविल्यावर शहर सुंदर दिसायला लागते; तसेच सरकारी संकेतस्थळावरुनही निवडणूक आचारसंहितेच्या निमित्ताने मंत्री आणि राजकीय पुढार्‍यांचे छायाचित्र हटल्याने वाचकांना या संकेतस्थळावरील मजकुराचा खर्‍या अर्थाने वाचनानंद घेता येत आहे. निवडणुकीनंतरही राज्य सरकारने अशाच पध्दतीने चमकोगिरीला पायबंद घातल्यास सरकारी संकेतस्थळांचे वापरकर्तेही मोठय़ा प्रमाणात वाढतील, अशी अपेक्षा आहे.


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पुढार्‍यांच्या प्रसिध्दीलोलुपवृत्तीला काहीसा आळा बसला आहे. निवडणुक आचारसंहितेचे नियम सर्वांनाच लागू असल्याने सरकारी यंत्रणेलाही मंत्र्या, पुढार्‍यांची छायाचित्रे सार्वजनिक स्थळांवरुन हटवावी लागत आहेत. त्यात विशेषत: संकेतस्थळांवर अधिक काळजी घ्यावी लागली आहे. एरवी या संकेतस्थळांवरील माहिती मंत्री आणि पुढार्‍यांच्या छायाचित्रांमुळे झाकली जाते. बर्‍याच वेळा छायाचित्रांच्या जंजाळात महत्वाची माहिती वाचकाला सापडतच नाही. शिवाय सत्कार समारंभ, भाषणे असे कौतुक कार्यक्रमांचे भरमसाठ छायाचित्र या संकेतस्थळांवर टाकण्यात येत असल्याने त्यातून कामाचा मजकूर शोधावा लागत असे. मात्र आचारसंहितेमुळे या संकेतस्थळांवरील सर्वच राजकीय हेतूने टाकण्यात आलेली छायाचित्रे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे त्यावरील माहिती वाचणे वाचकांना पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.