आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Code Of Conduct News In Marathi, Nashik Municipal Corporation, Divya Marathi

आयुक्तांविरोधात फेरचौकशीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खत प्रकल्प खासगीकरणासह विविध कामांच्या निविदा प्रसिद्धीतून महापालिका आयुक्तांनी लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणीच्या वादासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी पाठवलेल्या अहवालावर आता अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. दिल्लीत उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची भेट घेऊन फेरचौकशीची मागणी केल्याची माहिती चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
चव्हाण यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली. दरम्यान, 2 एप्रिलला चव्हाण यांनी याप्रश्नी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर जिल्हाधिकार्‍यांकडून तातडीने मागवलेल्या अहवालात तत्त्वत: काही निर्णय चुकीचे असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी मान्य केले होते. त्यानंतरही आयुक्तांवर कारवाई का झाली नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर त्रिपाठी व प्रधान सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे केली.