आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक व्हेंटिलेटरमुळे गंभीर रुग्णांना संजीवनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अपघातांमध्ये जखमी झालेल्या अथवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात चार अत्याधुनिक व्हेंटिलेटर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी येणार्‍या अवाढव्य खर्चात सामान्य रुग्णांची बचत होणार आहे.

गंभीर अवस्थेमध्ये असणार्‍या रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्श्वासाची आवश्यकता असते. अशा रुग्णांना खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याशिवाय गत्यंतर राहात नाही. काही रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाही तर ते दगावण्याचीदेखील शक्यता असते. काही खासगी रुग्णालयांतून गंभीर अवस्थेतील रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तेथे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आतापर्यंत उपचारांवर र्मयादा येत होती. ही निकड लक्षात घेऊनच शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले व्हेंटिलेटर मशीन कार्यान्वित केले आहे.


असे आहे मशीन
परदेशातून आणलेले ड्रॅगर कंपनीचे हे मशीन वीजपुरवठा खंडित झाल्यावरही बंद न पडता सुरू राहते. ते स्वयंचलित असून विशेषत:, गंभीर श्वसन विकारांमध्ये रुग्णाचे प्राण वाचवण्यात उपयुक्त ठरते.


काय आहे एबीसी
एबीसीशिवाय ( एअरवे, ब्रीदिंग, सक्यरुलेशन) रुग्ण जगत नाही. हे तीन घटक रुग्णास वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. यालाच वैद्यकीय भाषेत बेसिक लाइफ सपोर्ट असे म्हणतात.


गंभीर आजारात लाभदायी
कोमात असणारे, बेशुद्ध, हृदयविकार, छातीचे गंभीर आजार, सर्पदंश आदी रोगांच्या रुग्णांसाठी हे मशीन अत्यंत लाभदायक आहे. खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटरसाठी साधारणपणे प्रतिदिन 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. जिल्हा रुग्णालयात मात्र ही सुविधा पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहे. डॉ. रवींद्र शिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक