आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या अस्थिंचे गोदेत विसर्जन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या अस्थिंचे शनिवारी सकाळी रामकुंडात विसर्जन करण्यात आले. या वेळी मोहाडीकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून देणा-या चित्रांच्या मांडणीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शनिवारी सकाळी अस्थिकलश हुतात्मा स्मारकात आणण्यात आला. काही वेळ या ठिकाणी अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, उद्योजिका मीनल मोहाडीकर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, तहसीलदार सुचेता भामरे, साने गुरुजी कथामालेचे वर्धा येथील सदस्य, पंडितराव येलमामे, डॉ. गजानन कोटेवार, गौरीशंकर तिवडेवाल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रंजना पाटील आदी उपस्थित होते. शासनाच्या वतीने तहसीलदार भामरे यांनी
पुष्पचक्र वाहिले. साने गुरुजींचे आवडते शिष्य असणा-या व जीवनभर विविध सामाजिक चळवळींमध्ये भाग घेणाºया मोहाडीकर यांनी नाशिक जिल्ह्यातही स्वातंत्र्य चळवळीतून योगदान दिले होते.