आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरमची सुटी अचानक बदलल्याने गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मोहरमची गुरुवारी जाहीर केलेली पूर्वनिश्चित सुटी अचानक बदलत शासनाने ती शुक्रवारी केली. त्यामुळे आधीच सुटीच्या नियोजनात असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांची आणि त्याच दिवशी कामे निर्धारित केलेल्या नागरिकांचा गोधळ उडाला, तर काहींनी गुरुवारी सुटी घेतल्याने त्यांना दोन दिवस सुटीचा आनंद उपभोगता आला.

दिवाळीच्या सुट्यांचा फिवर संपल्यानंतर सोमवारपासून शासकीय कार्यालये सुरू झाली. नागरिकांनीही कामे करण्यासाठी नियोजन सुरू केले. सोमवार व मंगळवारी काहीअंशी निराशाच त्यांच्या पदरात पडली. त्यामुळे बुधवारपासून कामास सुरुवात होण्याची अपेक्षा होती. परंतु, गुरुवारी मोहरमची सुटी असल्याने पुन्हा एकदा शुक्रवारीच कामे करण्याची तयारी केली असता अचानकपणे शासनाने शुक्रवारची सुटी जाहीर केल्याने व त्याची माहिती सामान्यांपर्यंत न पोहचल्याने गुरुवारचे नियोजन केलेल्या नागरिक, कर्मचार्‍यांना धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे स्टेट बॅँकेने याबाबत जाहिरात देत गुरुवारऐवजी शुक्रवारी सुटी जाहीर करत ग्राहकांचा गोंधळ दूर केला. दुसरीकडे शुक्रवारचे नियोजन असलेल्यांना मात्र सुटीमुळे आपली कामे थांबविण्याची वेळ आली. तसेच शनिवार अर्धा दिवसच कार्यालये सुरू असल्याने थेट सोमवारीच कामांचे नियोजन केले आहे.