आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातू मोहितच्या हत्येच्या धक्क्याने अाजाेबांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मालेगाव येथील मोहित बाविस्कर या विद्यार्थ्याचा २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या झाल्याचा धक्का सहन झाल्यामुळे त्याचे अाजाेबा दाेधा यादव बच्छाव (७६) यांचे निधन झाले. दरम्यान, या प्रकरणी पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.मालेगावचे बाविस्कर कुटुंबीय मोहितच्या खुनाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच ही घटना अाजाेबा दाेधा बच्छाव (वय ७६, रा. जुनी बेज, कळवण) यांना समजली. त्यांनाही धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला हाेता. पाठाेपाठ नातवाचा अशा रितीने मृत्यू झाल्याचा अाघात सहन झाल्यामुळे त्यांचे साेमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोहितची आई अजूनही मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत. माझा माेहित परत येईल, असेच त्या वारंवार म्हणतात. पाठाेपाठ वडिलांच्या निधनामुळे त्यांना अाणखीच धक्का बसला अाहे.
या घटनेत दूरचित्रवाणीवरील एखाद्या गुन्हेगारी मालिकेप्रमाणेच बालपणीच्या सवंगड्याच्या संपत्तीवर डाेळा ठेवून अल्पावधीतच श्रीमंत हाेण्याच्या लालसेने मित्रच थेट त्याच्या जिवावर उठल्याचा प्रकार घडला असून या घटनेने बाविस्कर कुटुंबीयांसह नातलग अाणि मित्र परिवाराला प्रचंड हादरा बसला अाहे. त्यातूनच संशयितांवर हल्ला हाेण्याची शक्यता पाहता काेर्टात पाेलिसांकडून कडेकाेट बंदाेबस्त तैनात करण्यात अाला असतानाही संतप्त नातलगांचा संयम सुटल्याने काहींनी त्यांच्या अंगावर हात टाकत मारहाणीचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

मालेगाव येथील व्यावसायिक प्रलीन बाविस्कर यांचा मुलगा मोहित यास नाशकातील गोळे कॉलनी भागातून त्याचे बुधवारी (दि. १४)अपहरण करण्यात अाले हाेते. त्याचा एक मित्र आणि दुसरा रूमपार्टनर आकाश ऊर्फ कुशल दत्तात्रेय प्रभू (रा. जव्हार) या दोघांनी मोहितला बुटेलवरून फिरवून अाणण्याचा बहाणा करत त्याचे अपहरण केल्याचा संशय पाेलिसांनी वर्तविला हाेता. त्याचा शाेध सुरू असतानाच माेहितच्या वडिलांना २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी माेबाइलवरून फाेन येत हाेता. याच कालावधीत त्र्यंबकेश्वरमधील सापगाव-जव्हाररोडवर निर्जनस्थळी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केलेला मृतदेह पाेलिसांना अाढळला. ताे माेहितचाच असल्याचे निष्पन्न हाेताच बाविस्कर कुटुंबीयांना धक्काच बसला. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामध्ये या दाेघांचाही सहभाग हाेता.
घटनास्थळीच संशयितांचा पंचनामा : पथकाने संशयितांच्या चाैकशीत त्याच्या अपहरणाच्या ठिकाणावरून त्यास ज्या मार्गाने फिरवले, फाेन केला, त्या मार्गाची त्यांच्यासमक्ष पाहणी केली. गाेळे कॉलनी येथून मोहितला बुटेलवररून काठेगल्ली येथे नेण्यात आले. नागजी परिसरात एका मोबाइल दुकानात रिचार्ज केले. बुधवारी सायंकाळीच सापगाव शिवारात नेऊन त्याची हत्या करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशी संशयित महाविद्यालयात आले. दुपारी वाजता गोविंदनगर येथून प्रलीन बाविस्कर यांना खंडणीसाठी फोन केला. त्यापाठाेपाठ काही काळातच दुसरा फोन तपोवन परिसरातून, तर तिसरा काॅल द्वारका, काठे गल्ली येथून करण्यात अाल्याची माहिती उघडकीस अाली.

माता-पित्यांचाही घात, पाेलिसांना चकवा...
मुख्य संशयित माेहितचा बालपणाचा मित्र त्याचे अपहरण झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याच्या शाेधकार्यासाठी बाविस्कर कुटुंबीयांबराेबर वावरत हाेता. एवढेच नव्हे तर जणू अापला भाऊच हरवला अाहे, अशा पद्धतीने त्याच्याविषयीची चिंता व्यक्त करीत माेहितच्या वडिलांना धीर देत हाेता. ते ज्या ज्या ठिकाणी चाैकशीसाठी जायचे अथवा पाेलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले, या सर्वच प्रक्रियेत ताे सहभागी हाेता. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या दाेघा संशयितांनी पोलिसांना चकवा देत दिशाभूल केली. मात्र, दुष्कृत्य लपविण्यासाठी त्यांनी केलेले हे सर्व प्रकार पाेलिसांना संशय येण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर पाेलिसी खाक्या दाखविताच त्यांनी निर्दयीपणाने केलेल्या खुनाची कबुली दिली.