आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस लाखांच्‍या खंडणीसाठी नाशिकमध्‍ये युवकाची दगडाने ठेचून हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशकात 20 लाख रूपयांच्‍या खंडणीसाठी मोहित बाविस्कर या युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. 15 ऑक्‍टोबरला मोहितचे अपहरण करण्‍यात आले होते.
मोहित हरवल्‍याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रारही नोंदवण्यात आली होती. मात्र, आज शनिवारी या तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मोहित हा मुळचा मालेगावचा रहिवासी आहे. शिक्षणानिमित्‍त तो नाशिकमध्‍ये असल्‍याने मित्रांसोबत गोळे कॉलनीत राहत होता. 15 तारखेपासून मोहित बेपत्‍ता होता तो कोणालाच दिसलाही नाही.
पोलिस या प्रकरणाचा गुप्तपणे तपास करीत होते. मात्र, काल एक बेवारस मृतदेह नाशिक पोलिसांना आढळून आला होता. याच मृतदेहाच्या ओळख परेडसाठी मोहितच्या कुटुंबियांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी हा मोहितचाच मृतदेह असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्‍यानुसार पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, त्र्यंबकेश्‍वरजवळ फकून दिला मृतदेह..
बातम्या आणखी आहेत...