आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक - 20 लाख रूपयांच्‍या खंडणीसाठी मित्रांनीच केली मोहितेशची हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकात 20 लाख रूपयाच्‍या खंडणीसाठी मोहितेश प्रलिन बाविस्कर या युवकाची हत्‍या झाली आहे. ही हत्‍या त्‍याच्‍या मित्रानेच केल्‍याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्‍यात घेतले आहे. मित्रांनीच मोहितेशच्‍या फोनवरून त्‍याचा पालकांशी संपर्क करून 20 लाख रूपयांची मागणी केली होती. रक्‍कम न दिल्‍यास त्‍याला ठार मारू असेही अज्ञात व्‍यक्‍ती म्‍हणाला होता. त्‍यानंतर चिडलेल्या अपहरणकर्त्यांनी मोहितची दगडाने ठेचून हत्या केली व त्र्यंबकेश्वर जवळील एका गावात त्याचा मृतदेह फेकून दिला.

असे आहे प्रकरण

- 14 ऑक्‍टोबर, बुधवारी रात्री 11.30 वाजता अज्ञात व्यक्तींनी मोहितेशचे अपहरण केले़.
- 15 ऑक्‍टोबर, गुरूवारी मोहितेशच्‍या वडिलांना फोन करून अज्ञात व्‍यक्‍तीने 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. रक्‍कम न दिलयास मोहितेशला ठार मारण्‍याची धमकीही दिली.
- वडील प्रलिन बाविस्कर यांनी गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार दिली.
- 16 ऑक्‍टोबर, शुक्रवारी त्र्यंबकेश्वर-जव्हार रोडवरील एका शेताच्या मोरीजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती डी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठविला.
- अज्ञात मृतदेहाची चौकशी करण्यासाठी बाविस्कर कुटुंबीय गेले असता हा मृतदेह मोहितेशचा असल्याचे त्‍यांनी ओळखले.
मोहितेश मुळचा मालेगावचा
मोहितेश मूळचा मोतीबाग नाका, कलेक्टरपट्टा, मालेगाव येथील रहिवासी आहे. त्‍याचे वडिल प्रलिन बाविस्‍कर हे मालेगावमधील व्‍यावसायिक. मोहितेश आयआयटी परीक्षेच्या क्लाससाठी नाशिकमधील गोळे कॉलनीतील वसतिगृहात मित्रांसोबत राहात होता. मोहितच्‍या हत्‍येनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोहितेशचे मित्र-मैत्रिणी, कुणाशी भांडण होते का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला.
मालेगाव हादरले
अज्ञात मृतदेहाची चौकशीनंतर ओळख पटल्‍यानंतर मोहितेशच्‍या हत्‍येची बातमी वा-यासारखी नाशिक, मालेगावमध्‍ये पसरली. या घटनेनंतर मालेगाव शहर चांगलेच हादरले. मोहितच्या नातलगांनी नाशिककडे धाव घेतली. त्याच्या कलेक्टर पट्टा भागासमोरील घरातही एकच कल्लोळ झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह मालेगावला आणण्यात आला. तेव्हा आईसह नातलगांनी हंबरडा फोडला. मोहितेशवर सायंकाळी श्रीरामनगर अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.