आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोक्का आरोपीकडून पीएसआयला मारहाण; मोबाइलवर बोलण्यास मज्जाव केल्याचा राग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एक कोटीच्या लूट प्रकरणात मोक्काअंतर्गत अटकेत असलेला सराईत गुन्हेगार समीर पठाण व त्याच्या साथीदाराने बुधवारी भरकोर्टात पोलिस उपनिरीक्षक सचिन सावंत व अन्य दोन पोलिसांवर हल्ला चढविला. टिप्पर गॅँगचा म्होरक्या सुनील अनर्थे यास मोबाइलवर बोलताना हटकल्याच्या कारणावरून आरोपींनी हे कृत्य केले.
समीर पठाण, सुनील अनर्थे, गणेश वाघ, नागेश सोनवणे, नितीन काळे, सोनल भडांगे यांना वर्षभरापूर्वी मोक्का अन्वये अटक करण्यात आली होती. बुधवारी त्यांना मध्यवर्ती कारागृहातून न्यायालयात तारखेसाठी हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आवारातच संशयित अनर्थे एका मित्राच्या मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत होता. त्यामुळे हवालदार सोमनाथ गुंबाडे यांनी त्यास रोखले. त्यावर आरोपींनी गुंबाडेला दमदाटी केली. उपनिरीक्षक सावंत यांनी हस्तक्षेप करत आरोपींकडून मोबाइल हिसकावून घेतला. याचा राग आल्यामुळे पठाण, अनर्थे व इतर आरोपींनी सावंत व इतर पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, नंतर फौजफाट्यासह अधिकारी कोर्टात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

पुढील स्लाइडमध्ये, वृत्तपत्र कार्यालयांची फलटणमध्ये तोडफोड