आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादा व्याजाचे आमिष दाखवत ५० लाखांना गंडा; केबीसीनंतर दुसरा घोटाळा उघडकीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जादा व्याजाचे आमिष देण्याचे सांगून सुमारे ५० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार काठेगल्ली येथे उघडकीस आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात कंपनीच्या पाच संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. केबीसीनंतर दुसरा मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिलिंद निकम (रा. दिंडोरीरोड) यांच्या फिर्यादीनुसार ललित बुऱ्हाडे, रोहिणी बुऱ्हाडे, महेश बुऱ्हाडे, सुनील शहाणे सुप्रिया शहाणे (सर्व राहणार अभिनव रिव्हर व्ह्यू,काठेगल्ली) या संशयितांना रोहिणी इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी स्थापन केली. कंपनीमध्ये मोठ्या रकमांवर मासिक सात टक्के व्याज देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. ठरलेल्या वेळेत व्याजाची रक्कम मिळत नसल्याने निकम यांनी गुंतवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी तगादा लावला होता. संशयितांनी व्याज आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत देता हडप केली. संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीमध्ये सात गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आकडा वाढण्याची शक्यता मासिक टक्के व्याज
रोहिणी इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांश कंपनीच्या संचालकांच्या ओळखीचे आहेत. गुंतवलेल्या रकमेवर मासिक सात टक्के व्याज देण्याची योजना होती.