आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दिवसांत मान्सून राज्यव्यापी होणार, मुसळधार पावसाने नाशिकची दाणादाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक शहरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले हाेते. - Divya Marathi
नाशिक शहरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले हाेते.
पुणे - राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून बुधवारअखेर (१४ जून) मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल हवामानशास्त्रीय घटकांची उपलब्धता असल्याने येत्या दोन दिवसांत (१६ जूनपर्यंत) मान्सून राज्यव्यापी होऊन गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
 
बुधवारी कोकणासह घाटमाथ्यावर, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग अाणि विदर्भाचा काही भाग, येथे मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्याची नोंद आहे. केरळपासून महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आसाम, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,छत्तीसगड परिसरातही चक्रीय वाऱ्यांची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण भागावरही कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. त्याची तीव्रता वाढल्यास पावसाचा मुक्काम वाढू शकतो.
 
एक तास मुसळधार पावसाने नाशिक शहराची दाणादाण, रस्त्यांना तळ्याचे रूप
सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी नाशिकमध्ये सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण उडाली. केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर महापालिकेचे मुख्यालयही गुडघाभर पाण्याखाली गेले हाेते. महापाैरांच्या निवासस्थानासमाेरही हीच परिस्थिती हाेती. पुण्यातही बुधवारी दमदार पाऊस झाला. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबक राेडवर पाणी साचल्याने काही वेळेतच वाहतूक ठप्प झाली. मुख्य म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासमाेर सातपूरकडे जाणारा रस्ताच पाण्याखाली गेल्यामुळे एका बाजूनेच वाहतूक सुरू हाेती. परिणामी माेठमाेठ्या बसेसबराेबरच ट्रकसारख्या वाहनांमुळे काेंडी वाढली. थेट ए.बी.बी. सर्कलपर्यंत पावसामुळे चक्का जाम झाला. पालिकेच्या राजीव गांधी भवनसमाेरील कॅनडा काॅर्नरपर्यंतचा रस्त्यावर यंदा गुडघ्याइतके पाणी साचले.
 
पुण्यात रात्री साडेआठपर्यंत ५१.८ मिलीमीटर तर लोहगाव येथे ५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हडपसर, येरवडा, कात्रज, वाघोली या उपनगरांसह जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, खेड, शिरूर येथेही चांगला पाऊस झाला.
 
वैजापूरमध्‍ये मुसळधार पावसाने घरांची पडझड, नदी-नाले खळाळले
वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव परिसरात आज साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे परिसरातील नदी नाले ओसांडून होते. या पावसामुळे ढेकू नदीला पाणी आले होते. . मृग नक्षत्रातील या पावसामुळे लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकूण मृग नक्षत्रात लागवड केल्याने उत्पादन क्षमता वाढते असे जुने जाणते सांगतात.
 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...
 
ही एक बातमी...
 
बातम्या आणखी आहेत...