आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक शहरात, अखेर बरसला मान्सून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात दहा दिवस उशिरा दाखल झालेला मान्सून अखेर गुरुवारी दुपारी शहरात बरसला. पहिल्या पावसाची 8 मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली. या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही शहरवासीय खुल्या मनाने घेतला. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, तर जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग कार्यालय परिसरात पाणी साचले होते. गुरुवारी तपमानातही घट झाली असून, कमाल 30.2, तर किमान 23.5 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.
दरवर्षी सात-आठ जूनला दाखल होणारा मान्सून यंदा सहा दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र सहा दिवस उलटूनही मान्सूनचा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होता. शहरवासीयांनाही पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची भीती वाटत होती. अखेर गुरुवारी दुपारी साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास तिडके कॉलनी, सातपूर, नाशिकरोड, विहितगाव, लॅमरोड, वडनेर दुमाला, पाथर्डी फाटा, अंबड, राणेनगर, कॉलेजरोड, महात्मानगर रोड, पंचवटी, आडगाव, मुंबईनाका, द्वारका, मेरी, गंगापूररोड या भागात जोरदार पाऊस झाला. उघडीपनंतर पुन्हा पाऊस झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. शाळा सुटण्याच्या दरम्यान पाऊस पडल्याने विद्यार्थ्यांनीही पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने तपमानात घट झाली होती. मात्र दुपारनंतर पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.