आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरावर पालिका निवडणूक, तरी जुळेना काँग्रेस अाघाडीचे सूत, इच्छुकांमध्ये चलबिचल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती महापालिकेत सुधारायची असल्यास अाघाडी अावश्यक असल्याचा सूर दाेन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनीही त्यांच्या वरिष्ठांपुढे व्यक्त केला हाेता. नाेव्हेंबरअखेरपर्यंत त्याबाबतचा निर्णय घेण्याचे दाेन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून जाहीर करण्यात अाले हाेते. मात्र, डिसेंबर महिना उलटून जानेवारीच्या मध्याकडे वाटचाल सुरू हाेऊनदेखील त्याबाबत केवळ चालढकल अाणि वेळकाढूपणा केला जात असल्याने दाेन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये चलबिचल अाहे. 
 
प्रभागांचा अाकार प्रचंड माेठा झाल्याने अाधीच सर्वच पक्षांमध्ये चांगले पॅनल हाेणार असेल तरच लढत देण्याकडे कल वाढत अाहे. अशा परिस्थितीत दाेन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अाघाडीबाबतची मानसिकता तयार झालेली हाेती. तसेच त्याबाबतची अंतिम बाेलणी निश्चित हाेण्यासाठी दाेन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती तयार करण्याची घाेषणा काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी भाई जगताप यांनी केली हाेती.
 
मात्र, नाशकात अालेले विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अाघाडीबाबत फेरविचार करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर दाेन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता तर अाघाडीबाबत सकारात्मक निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली अाहे. उत्तर महाराष्ट्र प्रभारी भाई जगताप यांनी माध्यमांशी बाेलताना यंदा लवकर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले हाेते. 
 
धरसाेडवृत्तीचा फटका : काँग्रेसकडूनअाघाडीबाबत सकारात्मक स्वबळावर असे नारे दिले जात अाहेत. त्यातच ज्या माेजक्या प्रभागात पक्षाचे पॅनल भक्कम मानले जात हाेते, तिथेही विद्यमानांना डावलले जाण्याच्या भीतीपाेटीच एका नगरसेवकाने पक्षाला रामराम ठाेकल्याचे उदाहरण ताजे अाहे. तर दुसऱ्या नगरसेवकाने पॅनल हाेत नसल्याचे दिसताच पक्षांतर केले. अशा स्थितीत जानेवारी अाल्याने दाेन्ही पक्षांचे इच्छुक गॅसवर असून पॅनल कधी बनवायचे तयारी कधी करायची असा संभ्रम निर्माण झाला अाहे. 
 
अाघाडीबाबत सकारात्मक 
- अाघाडीबाबत निर्णयजाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्याकडे येत्या तीन दिवसांत बैठक हाेणार अाहे. स्थानिकांच्या निर्णयानुसार अंतिम निर्णय घेण्याचे सर्वानुमते ठरले असून अाघाडी हाेण्याची शक्यता अाहे, असे मला वाटते. 
- शरद अाहेर , शहराध्यक्ष, काँग्रेस