आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगातील 76 टक्क्यांहून अधिक महिला कच्च्या कैदी; क्षमतेपेक्षा दुप्पट संख्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील कारागृहांमधील महिला कैद्यांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक कच्च्या कैदी असल्याची आकडेवारी राज्य महिला आयोगाने गठीत केलेल्या विशेष तपास पथकाने समोर आणली आहे. तसेच, कारागृहाच्या क्षमतेपेक्षा प्रत्यक्षात महिला कैद्यांची संख्या दुप्पट असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या राज्यातील कारागृहांमध्ये ६६९ कैद्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात १ हजार १६५ महिला कैदी आहेत. त्यात दोषारोप सिद्ध झालेल्या फक्त २७७ कैदी असून ८८८ कैदी न्यायाधीन म्हणजे अंडर ट्रायल आहेत.


भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये या कैदी महिलेच्या मृत्युनंतर राज्य महिला आयोगाच्या वतीने ही समिती गठीत केली होती. यात निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली देशपांडे यांचा समावेश होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या न्यायाधीन म्हणजे कच्च्या कैद्यांना कायदेशीर सल्ला मिळावा, जामिनास पात्र असूनही जामीन न मिळालेल्या आणि विदेशी अशा तीन प्रकारातील महिला कैदींबाबत त्वरित निर्णय घेण्याची शिफारस या समितीने केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक क्षमता असलेल्या महिला कैद्यांना न्यायालयाच्या संमतीने इतर कारागृहांमध्ये वर्ग करण्यात यावे, महिलांसाठी नवीन खुले कारागृह उभारण्यात यावे, असे सुचवण्यात आले आहे.

 

> ६६९ कारागृहातील महिला कैद्यांची क्षमता
> ११६५ प्रत्यक्ष महिला कैद्यांची संख्या

> २७७ त्यापैकी अाराेप सिद्ध झालेल्या कैदी
> ८८८ अंडर ट्रायल कैदी

बातम्या आणखी आहेत...