आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात 10 दिवसांत आणखी व्हेंटिलेटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वाइनफ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे नाशिककरांची झाेप उडालेली अाहे. यातच शहरातील १४ लाख लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केवळ एकच व्हेंटिलेटर असल्याने या रुग्णालयात येणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांना थेट खासगी रुग्णालयात पाठविले जात असल्याची गंभीर बाब ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणली हाेती. या वृत्ताची दखल घेत आता या रुग्णालयात अतिरिक्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. येत्या दहा दिवसात ही यंत्रणा रुग्णालयात दाखल हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. २५ ऑगस्टला ‘दिव्य मराठी’ने जिल्हा रुग्णालयातील एकच व्हेंटिलेटरसंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. स्वाइन फ्लूने शहरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. या आजाराचे संशयित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या मुख्य स्वाइन फ्लू कक्ष असलेल्या या कक्षात डॉक्टरांची नेमणूक केलेली नसल्याने रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत आहे. अनेकांना रुग्णालय प्रशासनाकडून खासगी रुग्णालयात पाठविले जात आहे. दुसरीकडे, जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात गंभीर रुग्णांकरिता केवळ एकच व्हेंटिलेटर असल्याने जिल्हाभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. याची दखल घेत प्रशासनाने तातडीने या ठिकाणी सीएसआर फंडातून अतिरिक्त व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याची हालचाली सुरू केली आहे. येत्या दहा दिवसांत जिल्हा रुग्णालयात या नविन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...