आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डास निर्मूलनाचा ठेका रद्द; अाराेग्याधिकाऱ्यांना अाले रडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात नागरी हिवताप याेजनेंतर्गत तीन वर्षांसाठी धूरळणीचा ठेका रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीने केला. सर्वात कमी दराची निविदा असलेल्या दिग्विजय एंटरप्राईजेसकडील तांत्रिक चुका अाक्षेपांचा मुद्दा उपस्थित करून सदस्यांनी फेरनिविदेची मागणी केल्यानंतर त्याप्रमाणे कारवाईचे अादेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले. चर्चेदरम्यान एका सदस्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे अाराेग्यधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांना रडू काेसळले.

स्थायी समिती सभेत प्रतिवर्षी काेटी ६० लाख याप्रमाणे तीन वर्षासाठी धूरळणीचा १९ काेटींचा ठेका देण्याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी अाला होता. त्यास प्रा. कुणाल वाघ, राहुल दिवे अन्य सदस्यांनी विराेध केला. दरम्यान, राहुल दिवे यांनी अाराेग्याधिकारी डेकाटे यांचे कामकाज संशयास्पद असून, जिल्हा परिषदेतील कामकाजाचे रेकॉर्डही तेच सांगत असल्याचा अाराेप केला. त्यामुळे व्यथित झालेल्या डेकाटे यांना रडू काेसळले. त्यांनी रेकॉर्ड वादग्रस्त असेल तर स्थायीसमोर मांडा मला कार्यमुक्त करा, असे अाव्हानच दिले.