आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका मुख्यालयातच डास उत्पत्तीचा कारखाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसे नगरसेविकेच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्यानंतर अाराेग्य विभागाने केलेली टाेलवाटाेलवी दुसरीकडे बाधितांचा अाकडा दाेनशेपेक्षाही पुढे जाण्याची भीती लक्षात घेत महापालिका शहरात शुक्रवारपासून डेंग्यू जनजागरण माेहीम सुरू करणार अाहे. दरम्यान, घरापासून सुरुवात म्हणून पालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सफाई माेहीम घेतल्यावर तळमजल्यावर डास उत्पत्तीचा कारखानाच अाढळून अाला. अग्निशामक दलाने अक्षरश: पंप लावून येथे अनेक दिवसांपासून साचलेले पाणी काढले. दरम्यान, शहरात शंभर घरांमागे सरासरी पाच घरांत डासांच्या अळ्या अाढळल्या असून, १३८५ घरांत धाेकेदायक डास उत्पत्ती हाेत असल्याचे समाेर अाले.

गेल्या वर्षीपेक्षाही यंदा डेंग्यूची तीव्रता अधिक असल्याचे लक्षात घेत महापाैरांनी गुरुवारी बैठक घेऊन शहरात ‘अाॅपरेशन डेंग्यू’ माेहीम राबवण्याचे अादेश दिले. त्यानुसार शुक्रवारी शहरातील सहाही विभागात ही माेहीम हाेणार अाहे. तत्पूर्वी घरापासून स्वच्छता करण्याच्या उद्देशातून राजीव गांधी मुख्यालयाची सफाई करण्यात अाली. यावेळी तळमजल्यावर घाेट्याएवढे काळेशार गटारयुक्त पाणी साचल्याचे लक्षात अाले. जणू काही डास उत्पत्ती करण्याचा कारखानाच असल्यागत चित्र असल्याचे बघून लाेकप्रतिनिधीही हबकून गेले. दरम्यान, शुक्रवारपासून शहरात सुरू हाेणाऱ्या विभागनिहाय माेहिमेत एक-एक प्रभाग हाती घेऊन तेथे सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित केले जाणार अाहे. महापालिकेच्या शाळा, रुग्णालये वा इमारतींत स्वच्छता माेहीम राबवली जाणार अाहे. अाॅक्टाेबरपासून त्यासाठी सुरुवात केली जाणार अाहे.

पेस्ट कंट्राेलची ठेकेदाराला काम काढण्याची तंबी : नाशिक शहरात पेस्ट कंट्राेलचा तीन वर्षांसाठी महापालिकेने ठेका दिल्यानंतर अाॅगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, मात्र या काळात कामात सुधारणा हाेण्याचे साेडून डेंग्यूचा उद्रेक वाढला. पेस्ट कंट्राेल म्हणजे धुरळणी नसून, त्यात कीटकजन्य अाजारावर नियंत्रण अाणणे अपेक्षित अाहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदाराला नाेटीस बजावून तीन दिवसांत पेस्ट कंट्राेलच्या असमाधानकारक कामकाजाविषयी खुलासा करण्याचे अादेश दिले अाहेत. या नाेटिसीत तुमचा ठेका का काढून घेतला जाऊ नये, अशी विचारणाही केल्याचे जीवशास्त्रज्ञ डाॅ. राहुल गायकवाड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...