आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात मायलेकाचा मृत्यू, आजी-आजोबा गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील वस्तीवर राहणा-या शेतकरी कुटुंबावर दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री केलेल्या सशस्त्र हल्ल्यात माय- लेकाचा मृत्यू झाला. तर शेजारच्या खोलीत झोपलेल्या वृद्ध दांपत्यही गंभीर जखमी झाले.
संपत एकनाथ मोरे यांची मोंढे वस्तीवर शेती आहे. तिथेच ते वास्तव्यास असतात. मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शेणीत (ता. सिन्नर) शेती खरेदी केली असून गुरुवारी ते त्या ठिकाणीच मुक्कामी गेले होते तर इतर कुटुंबिय मात्र मोंढे वस्तीच्या घरातच होते. अज्ञात दरोडेखोरांनी गुरूवारी मध्यरात्री त्यांच्या घरावर हल्ला चढविला. यात मोरे त्यांची पत्नी संगीता उर्फ राजश्री (30) व मुलगा अनुज (10) यांचा मृत्यू झाला. तर मोरे यांचे वडिल एकनाथराव व आई हिराबाई ज्येष्ठ नागरिक दांपत्य गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरोडेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी या परिसरातील सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे बचावासाठी मोरे कुटुंबियांनी फोडलेला टाहो ऐकूनही त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेणे सुरू केले.

श्वान पथकाव्दारे शोध
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. मोरे यांच्या घरालगतचा परिसर श्वानाने पिंजून काढत पांडवलेण्याच्या दिशेने तब्बल दोन किमीपर्यंत श्वान पळाले. त्यामागे पोलिस गेले असता त्याठिकाणी मळ्यातील काही घरांचेही कड्या लावून हल्लेखोरांनी लूटीचा प्रयत्न केल्याचेही रहिवाश्यांनी सांगितले.

दरोडा की घातपात ?
अज्ञात दरोडेखोरांनी घरातील मौल्यवान ऐवज न लुटता धारदार शस्त्राने वार करून पुर्ववैमनस्यातून हल्ला केला की काही देण्या-घेण्यातून ही घटना घडली? अशी शंका उपस्थित केली जात आहे.