आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृदिन विशेष: मुलीसाठी २० वर्षे मागितली भीक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘भिक्षा द्या हाे माईऽऽ.. मुलीला शिकवायचं अाहे.. पैशे कमी पडताहेत.. तुमच्या भिक्षेने ती शिकेल अाे माई..’ नाशिक राेडच्या मंदिरांबाहेर सलग २० वर्षे भिक्षा मागणा-या या अाजीबाई.. तरुण वयातच मद्यपी नव-याने त्यांना घराबाहेर काढलं.. दुस-यांच्या घरी धुणी-भांडी करीत अाणि उर्वरित वेळेत भीक मागत या अाजीबाईंनी मुलीला शिकवलं. मुलीनेही अाईच्या या कष्टाची जाण ठेवत अभ्यास केला अाणि बारावीपर्यंत चांगल्या गुणांसह मजल मारलीय. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी या मुलीने विमान प्रवासही केला. नाशिकमधील छाया देवकाते यांची ही चित्तरकथा!

छाया देवकातेंचे अायुष्य सुरू झाले ते संघर्षातच. बुलडाण्याजवळील जयपूर काेथडी येथे त्यांचे माहेर. माहेरी कमालीचे दारिद्र्य. त्यांच्या अ ाई-वडिलांनी त्यांचे कमी वयातच लग्न लावून दिले. मात्र, नांदेड येथील सासरी छायाताईंचा संघर्ष थांबला नाही. नवरा मद्यपी असल्याने त्यांना राेजच मारहाण सहन करावी लागत हाेती. पुढे छायाताईंच्या घरात पाळणा हलला. छानशी मुलगी झाली. पण, बापाला त्याचा फारसा अानंद झाला नाही. त्याने छायाताईंसह अापल्या तान्हुल्या बाळाला घराबाहेरचा रस्ता दाखवला. या छाेट्याशा बाळाला घेऊन त्या रडत असताना एका वारक-याने छायाताईंना अासरा दिला. काही दिवसांत त्याने त्यांच्याबराेबर लग्न केले. पण, या संसारालाही दृष्ट लागली. त्यानेही दारू पिऊन छायाताईंना मारझाेड करणे सुरू केले. एकेदिवशी त्याने छायाताईंना घराबाहेर काढले अाणि तान्हुल्या गाेदावरीला घेऊन ताे पुन्हा दारू प्यायला निघून गेला. दारूची नशा चढल्यानंतर ताे रस्त्याच्या कडेलाच झाेपी गेला. ही बाब काही गावक-यांना कळली अाणि त्यांनी गाेदावरीला छायाताईंकडे सुपूर्द करून नव-याला चाेप दिला. त्यानंतर ताे जसा निघून गेला ताे परत अालाच नाही. त्यामुळे छायाताई एकाकी पडल्या.
नव-याबराेबर घराचा सहाराही गेल्याने रेल्वे प्लॅटफाॅर्मच त्यांचे घर झाले. त्यांनी धुणी-भांडी करायला सुरुवात केली. पण, त्यातून पाेट भरेल इतकेही उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्या निराश हाेऊन एका मंदिराबाहेर जाऊन बसल्या. काेणाला तरी वाटले, त्या भीक मागायला बसल्या अाहेत. त्याने अापल्याजवळील नाणे छायाताईंसमाेर फेकले. छायाताईंना पाेटाची खळगी भरण्याचा मार्ग सापडला. त्या उर्वरित वेळेत भीक मागू लागल्या. मुलीला चांगले शिकवण्याची जिद्द त्यांच्या मनाशी हाेती. देवळाली गाव येथील तक्षशिला विद्यालयात मुलीला शिकवले. गाेदावरी माेठी झाली, तशी लग्नसमारंभात वाढपी म्हणून काम करू लागली. शिक्षणाने भविष्य उजळेल, हे लक्षात अाल्यावर तिने मानपाठ एक करून दहावीचा अभ्यास केला. तिने दहावीला ७०.४० टक्के गुण मिळवले. तिने काही िदवस एका हाॅस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचे काम केले. कला शाखेत गाेदावरीने प्रवेश घेतला. इतकेच नाही, तर या महाविद्यालयात नेव्हलमध्ये ती अापली चमक दाखवत अाहे. त्याचीच परिणती म्हणून
२६ जानेवारीसाठीच्या दिल्लीतील परेडसाठी ितचा विचार झाला. मात्र, थाेड्यावरून तिची निवड हुकली, पण अंदमानला स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पसाठी मात्र तिची निवड झाली. या कॅम्पसाठी गाेदावरीने विमान प्रवास केला. अर्थात या सर्व प्रवासात अाई छाया देवकाते हिने घेतलेल्या कष्टामुळेच अाज अापण शिक्षण घेऊ शकलाे, असे गाेदावरी प्रामाणिकपणे सांगते.