आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Son Died In Accident, Angry Crowd Beaten Truck Driver

नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी जातानाच मायलेक अपघातात ठार, जमावाने ट्रकचालकाला चाेपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या मायलेकाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना सोमवारी सकाळी उंटवाडी रस्त्यावर घडली. दुचाकीवरून जाताना पाठीमागून वेगाने अालेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रक चालकाला पकडून बेदम चोप दिला ट्रकच्या काचा फोडल्या.

गंगापूररोड येथे राहणारे विवेक सुरेशचंद बोथरा (३५) त्यांची आई मानकुंवर सुरेशचंद बोथरा (६०) हे पवननगर येथील त्यांचे नातेवाइक मनसुखलाल छोरिया यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जात होते. उंटवाडीरोडवरील खेतवानी लाॅन्स समोरून जाताना मागून वेगाने आलेल्या ट्रकने (एमएच ०४ डीके ८३५६) त्यांच्या अॅक्टिव्हाला (एमएच १५ बीयू ४५९९) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दोघेही मायलेक रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच या मायलेकाचा अंत झाला.

या घटनेनंतर ट्रकचालक पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडले चाेप दिला. काहींनी ट्रकच्या काचा फोडल्या. अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

..अन‌् घडविले माणुसकीचे दर्शन : अपघातझाल्यास नागरिक पोलिसांना सहकार्य करीत नाहीत. नसत्या चौकशीचा फार्स कशाला म्हणून टाळाटाळ केली जाते. मात्र, या संपूर्ण घटनेत प्रत्यक्षदर्शींसह इतर अनेक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. अपघातासंबंधी सर्व माहिती दिली. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मदत केली. अपघातातील जखमींना अनेकांनी मदतीचा हात दिला.
कुटुंबातील कर्ता पुरुष गेला...
गंगापूरयेथे राहणारे विवेक बाेथरा हे त्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष हाेते. धुळे येथून ते नाशिकमध्ये अाले हाेते. त्यांचा किराणा व्यवसाय हाेता. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा मुलगी अाहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव हाेता असे भाजपचे पदाधिकारी महेश हिरे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये या मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात अाले. यावेळी विवेक यांचा छाेटा मुलगा सार्थकने अग्निडाग दिला. हा प्रसंग पाहून उपस्थित हेलावले.

स्मशानभूमीतही शोककळा
मोरवाडीतीलमनसुखलाल छोरिया यांच्या अंत्यविधीसाठी विवेक बाेथरा त्यांची आई येत असताना त्यांचे अपघातात निधन झाल्याची माहिती कळताच स्मशानभूमीत शोककळा पसरली. छोरियांना अग्निडाग दिला जात असतानाच बाेथरांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाइकांनी आक्रोश केला.
मृतदेह ताब्यात घेण्यावरून तणाव
अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. अंबड पोलिसांनी संशयित ट्रक चालकावर कडक कारवाई करण्याचे अाश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले.

मृत्यूनंतरही विवेक पाहणार हे जग
विवेक बोथरा यांच्या नातेवाइकांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतल्याने मृत्यूनंतरही विवेक हे बघत राहतील. अपघाती मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. अपघातात मुलगा आणि पत्नी गमावलेल्या सुरेशचंद यांचे सांत्वन नातेवाइक करीत हाेते.

जायभावे बनले वाहतूक पोलिस....
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तानाजी जायभावे तत्काळ घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी पोलिस रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. या वेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जायभावे यांनी थेट रस्त्यात उभे राहून वाहतूक पोलिसाची भूमिका बजावली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली परिस्थिती नियंत्रणात राहिली. लोकप्रतिनिधीच्या या कामामुळे पोलिसांना सहकार्य लाभले.
पुढे वाचा.. अतिशय दुर्दैवी घटना...