आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्तीतील वाटा साेडण्यासाठी अाईची मुलीलाच धमकी, पाेलिसांत गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई येथे राहणाऱ्या व्यवसायाने डाॅक्टर असलेल्या मुलीने विवाहानंतरही अापल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागू नये, यासाठी तिच्या जन्मदात्या अाईनेच तिला घरी अाल्यावर मालमत्तेच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यासाठी धमकाविल्याचा प्रकार टिळकवाडी भागात घडला अाहे. या प्रकरणी मुलीने अाईच्या विराेधात सरकारवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार देताच पाेलिसांनी अाईविरुद्ध धमकावल्याचा गुन्हा दाखल केला अाहे.

 

विवाहानंतरही मुलीचा अाई-वडिलांच्या संपत्तीत मालकी हक्क असताे,असा युक्तिवाद करीत मुलीने मालमत्तेत वाटा मागितल्यावर वाद झाल्याचा प्रकार टिळकवाडीतील सरदार बंगल्यात घडला. या प्रकरणी अंधेरी येथील रहिवासी डाॅ. तरणजीत काैर चढ्डा यांनी अाई संशयित मनजीत काैर माैनी यांच्याविरुद्ध तक्रार दिली अाहे. तक्रारीनुसार, गेल्या नाेव्हेंबरला डाॅ. काैर घरी अाल्या असता त्यांच्या अाईने वाद घालून ‘अामच्या संपत्तीतून तुला काहीच मिळणार नाही, मुकाट्याने या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून माेकळी हाे’, अशा शब्दात धमकावले. एवढेच नव्हे, तर घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता अाईने मुख्य दरवाजाची कडी लावून बाहेर जाण्यास मज्जाव केल्याचेही तक्रारीत म्हटले अाहे.

बातम्या आणखी आहेत...