आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत मायलेकांचा आगीने भाजून अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सावतानगरमधील गुरुदत्त चौकातील एका घरात स्वयंपाकाच्या वेळी लागलेल्या आगीत आई व मुलाचा जळून मृत्यू झाला. तर पती अशोक पवार हे गंभीर भाजले आहेत.

रिक्षाचालक असलेल्या पवार यांच्या घरात मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा हितेश (वय 7) खेळत असताना त्याचा धक्का रॉकेलच्या कॅनला लागून ते सर्वत्र पसरले. त्याची आई कविता पवार (वय 32) या स्वयंपाक करीत असल्याने गॅसचा भडका होऊन आग लागली. पत्नी व मुलास वाचवण्याच्या प्रयत्नात अशोक पवारही गंभीर भाजले. तिघांना शेजार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता रात्री उशिरा कविता व हितेश यांची प्राणज्योत मालवली.