आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motivala Homeopathic Medical College Get Together News

"मोतीवाला'मधील १६०० माजी विद्यार्थ्यांचा आज सहकुटुंब मेळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातील १६०० माजी विद्यार्थ्यांचा सहकुटुंब स्नेहमेळावा २४ २५ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असून, मेळाव्याच्या नियोजनासाठी कॉलेजतर्फे सहा महिन्यांपासून तयारी सुरू आहे.

मोतीवाला होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय यंदा २५ वर्षे पूर्ण करत आहे. या कॉलेजचे संस्थापक डॉ. फारुख मोतीवाला यांनी ते स्वतः वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतानाच स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. कुटुंबीयांच्या पाठबळावर ते प्रत्यक्षात साकार झाले.

१९८९ मध्ये एका छोट्याशा जागेत दोन विद्यार्थ्यांवर संस्थेचे काम सुरू झाले. डिप्लोमा, डिग्रीपाठोपाठ आता या महाविद्यालयात एम.डी. हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या २० बॅचेसमधील १६०० माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यास आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा येण्या-जाण्यासह राहण्याचा खर्चदेखील संस्थेच्या वतीने केला जाणार असून, शहरातील वेगवेगळ्या १०० हाॅटेल्समध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

इन्ट्रॅक्शनऑफ अॅल्युमिनिज् : याउपक्रमात विद्यार्थ्यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांना एक तास खुला राहणार आहे. यात त्यांना त्यांच्याच बॅचमधील विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा करता येतील.

बोन फायर नाइट
आपलीकला सादर करण्यासाठी "बोन फायर नाइट शाे'चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारातील वाद्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी "कल्चरल इव्हेंट'नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

"नाशिक ढोल'ने स्वागत
दोनदिवस चालणाऱ्या या महोत्सवास सहकुटुंब येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे नाशिक ढोलने स्वागत होईल. त्यानंतर आैक्षण फेटे बांधले जातील.

डाउनमेमरी लेन
विद्यार्थ्यांचेस्वागत झाल्यानंतर डाउन मेमरी लेन या उपक्रमात २५ वर्षांचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून सादर होईल. या वेळी जुन्या शिक्षकांना महाविद्यालयात आणण्यात येणार आहे. दोन ते तीन मिनिटे ते मार्गदर्शन करणार आहेत.