आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेला विवस्र अवस्थेत व्हिडिओ कॉलिंग करण्यास प्रवृत्त; नगरच्या आरोपीविरोधात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
नाशिक- सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण कधी फसेल याचा काही नेम नाही. अशाच प्रकारे एका विवाहितेला सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवत केलेले मेसेज पतीला दाखवण्याची धमकी देत एका भामट्याने विवाहितेला विवस्र अवस्थेत व्हिडिओ कॉलिंग करण्यास भाग पाडले. शुक्रवारी (दि. १५) नाशिक येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताचा शोध सुरू आहे.   
 
याप्रकरणी नाशकतील जेल रोड येथे राहणाऱ्या विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार मार्च ते ९ सप्टेंबर या कालावधीत संशयित महेंद्र नागरे (रा. राहाता,  जि. अहमदनगर) याने फेसबुकवर मैत्री केली. त्याने व्हाॅट्सअॅप नंबर घेऊन चॅटिंग सुरू केले. काही दिवसांपूर्वी त्याने विवाहितेला केलेले मेसेज तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देत, नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉलिंग करण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर तुझ्या घरी येऊन पतीला तुझे सर्व मेसेज दाखवीन, अशी धमकी दिली. त्यामुळे विवाहितेने त्याला नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉलिंग केले.  घरी कोणी नसताना धमकी देत एकटेपणाचा फायदा घेत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच वेळोवेळी धमकी देत व्हिडिओ कॉलिंग करण्यास भाग पाडल्याची तक्रार विवाहितेने पोलिसांत दिली. नाशिक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू  करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...