आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motivational Speaker Vijay Batra Program In Nashik

विजय बत्रा उद्या देणार सकारात्मकतेवर ‘टिप्स’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी’च्या चाैथ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (दि. १३)पासून महाेत्सवाला प्रारंभ हाेताे आहे. या महाेत्सवाची सुरुवात सकारात्मक कसे जगावे आणि एकूणच जगण्यातील, कामांतील व्यवस्थापन कसे करावे, या विषयावर प्रसिद्ध लेखक, काॅर्पाेरेट माेटिव्हेशनल स्पीकर विजय बत्रा मार्गदर्शन करणार आहेत. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी वाजता हा कार्यक्रम हाेईल. बत्रा यांनी जगभरात तरुण, व्यावसायिक आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केलेेले आहे.

पिता-पुत्राची पुस्तक संपदा
विजय बत्रा आणि त्यांचे वडील डाॅ. प्रमाेद बत्रा या दाेघांनी मिळून व्यवस्थापन, माेटिव्हेशन, सकारात्मकता, कर्मचार्‍यांशी व्यवस्थापनाचे वर्तन, आपल्या परिवाराला आनंदी कसे ठेवावे, या अशा विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. या पुस्तकांचे वाचकांची माेठ्या प्रमाणात स्वागतही केलेेले आहे.

शिक्षण प्रणालीविषयी प्रबोधन
भारतात १९९८ पासून ‘जगण्यात सकारात्मक विचार आणि काम करतानाचे व्यवस्थापन’ या विषयावर विजय बत्रा हे विविध माध्यमांतून काम करत आहेत.विविध स्तरांवर त्यांनी परदेशात शिक्षण आणि शिक्षण पद्धतीमध्ये राबविल्या जाणार्‍या प्रभावी शिक्षण प्रणालीचा अभ्यास करून त्याविषयी प्रबोधन केले आहे. आपल्या कार्यशाळांमधून ते प्रभावी शिक्षणशैली शिकवितात. िवजय बत्रा हे स्वच पीपल आॅन याद्वारे एक तंत्रच आपल्या व्याख्यानातून देतात. आपल्या कामाबद्दल बांधिलकी असावी, सक्ती नसावी, आपले लक्ष्य आणि सकारात्मक विचारांद्वारे एकेक पायरी चढले तर काहीच कठीण नसते; आपल्या मूलभूत कामाचे चांगले नियाेजन कसे करावे, जाणून घ्या, दाेष देऊ नका, असे काही मुद्दे ते आवर्जून साेदाहरण मांडतात.

प्रवेशिकांसाठी संपर्क
‘दिव्य मराठी’ उत्सवातील सर्व कार्यक्रम नाशिककर रसिक, वाचकांसाठी खुले आहेत. मात्र, प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रवेशिका ‘दिव्य मराठी’च्या चांडक सर्कल येथील कार्यालयातून देण्यात येणार आहेत. प्रवेशिका असणार्‍यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. शनिवारी (दि. १३) होणार्‍या कार्यक्रमाच्या प्रवेशिका शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयातून दिल्या जात असून, त्यास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद मिळताे आहे. इच्छुकांसाठी मर्यादित प्रवेशिका उपलब्ध आहेत.

माेटिव्हेशनल स्पीकर विजय बत्रा
विजय बत्रा यांनी १९८६ मध्ये एमबीए केले. नंतर जपान, अमेरिका इन्स्टिट्यूट अॉफ मॅनेजमेंटमधून त्यांनी सहा महिन्यांची जापनीज मॅनेजमेंट स्कॉलरशिप घेतली. १९८७ ते १९९८ टोकियोमध्ये काम केले.

एमबीए पूर्ण करण्यापूर्वी ते बाल्टिमाेर येथील स्विच काॅर्पाेरेशन या कंपनीत कार्यरत हाेते. जेम्स येथील प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी कानकाऊ सिक्युरिटीसाठीही सन १९८७ ते १९९९ पर्यंत काम केले आहे.

दि. 1 जुलै १९८७ मध्ये त्यांनी दाई-कॅनरा कँग्याे या बँक समूहातही सेवा दिली. टाेकियाेतील न्यू मिझुहाे सिक्युरिटीजमध्येही त्यांनी १९८७ पर्यंत कामकाज केले.

१९९९ नंतर ते तीन वर्षे जपानमध्ये वास्तव्यास हाेते. त्यानंतर नऊ वर्षे न्यूयाॅर्कमध्ये त्यांचे वास्तव्य हाेते. हाेन या ठिकाणी त्यांनी पीएचपी इन्स्टिट्यूटमध्ये प्राैढ शिक्षणासाठी काम केले.