आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोतीवाला मेडिकल कॉलेजमध्ये 40 टक्के सवलतीत चाचण्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैद्यकीय चाचण्या करताना रुग्णांकडून जादा पैसे घेऊन प्रत्यक्षात त्यातील 80 टक्के रक्कम शिफारसकर्त्याच्या खिशात कशी जाते, यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर आता मोतीवाला मेडिकल कॉलेजनेही 40 टक्के सवलतीच्या दरात चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सवलतीच्या दरातील नवीन दरपत्रकही कॉलेजने जारी केल्याची माहिती सीएमओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी दिली.
‘दिव्य मराठी’ने पॅथॉलॉजीतील कट प्रॅक्टिसवर प्रकाश टाकल्यानंतर रामालयम हॉस्पिटल व संलग्न सामाजिक संस्थांनी 20 टक्के सवलतीच्या दरात रक्त व अन्य वैद्यकीय चाचण्या करून देण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ मोतीवाल कॉलेज व्यवस्थापनानेही 40 टक्के सवलतीच्या दरात चाचण्या करून देण्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले. यापूर्वीही संस्थेकडून चाचण्या करणार्‍यांना सवलत दिली जात होती. मात्र, या अभियानाचा विचार करून आता 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय कॉलेज व्यवस्थापनाने घेतला आहे.