आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये उद्या साहसपटांचा उत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगभरातील साहसवीरांच्या अजाेड कामगिरीचे दर्शन घडविणारा टीजेएसबी बँक पुरस्कृत बांफ ‘माउन्टन फिल्म फेस्टिव्हल’ नाशिकमध्ये रविवारी (दि. १०) दुपारी ते सायंकळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत रावसाहेब थाेरात सभागृहात हाेणार आहे. हिमालयन क्लबच्या मान्यतेने वैनतेय गिर्याराेहण संस्थेने या महाेत्सवाचे आयाेजन केले आहे.

एक पाय गमावलेला असूनही कुणी स्किईंग करताेय, कुणाचे अत्यंत लहान वयात अवघड प्रस्ताराराेहण सुरू आहे, कुणी सुळक्यांच्या कुशीत सायकलिंग करतंय, कुणी अशा अनेक साहसवीरांच्या जगावेगळ्या चाललेल्या साहसी उद्याेगांच्या लघुचित्रफिती एकत्रितरीत्या पाहण्याचा याेग नाशिककरांना यानिमित्ताने मिळणार आहे. जगातील सर्वाेत्तम अशा माउंट फिल्मस््चा हा उत्सव नाशिककरांसाठी उपलब्ध झाला आहे. जगात दरवर्षी साहसी खेळात सर्वाेच्च कामगिरी करणारे साहसवीर, त्यांचे प्रत्यक्ष शूटिंग करणारे साहसी कॅमेरामन, त्यांचे दिग्दर्शक निर्मिती चमू आपले सर्वाेत्तम चित्रपट तसेच लघुपट बांफ चित्रपट महाेत्सवाकरिता पाठवतात. अशा सुमारे तीनशे प्रवेशिकांमधून निवड समिती २५ चित्रपटांची निवड वर्ल्ड टूरकरिता करत असते. गिर्याराेहण, स्किईंग, कयाकिंग, सायकलिंग, बेजजम्पिंग, स्नाे बाेर्डिंग यासारख्या साहसी विषयांचा चित्रपटांमध्ये अंतर्भाव असताे. भारतात गेल्या पाच वर्षांपासून फक्त मुंबईमध्ये हिमालयन क्लब या संस्थेच्या वतीने हा उत्सव हाेत आहे. परंतु, या वर्षीपासून नाशिकसह इतरही शहरांमध्ये हा फिल्माेत्सव अनुभवायला मिळेल.

उत्सवामध्ये १३ फिल्मस्चा समावेश असून या निमित्ताने यापासून प्रेरणा घेऊन तरुणांनी साहसी खेळांत जागतिक दर्जाची कामगिरी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, हा या महाेत्सवाचा हेतू आहे. प्रवेशिकांकरिता टकले बंधू सराफ, सराफ बाजार, साई स्पाेर्ट्स, कॅनडा काॅर्नर, मित्र विहार काॅम्प्लेक्स येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...