आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movement Going On To Change Of Party Leader Of Nationalist Congress

गटनेता बदलाच्या राष्ट्रवादीत हालचाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेतील गटनेता बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून सोमवारी मुंबईत होणार्‍या बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेत मनसे-भाजपची सत्ता असतानाही राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रखरपणे विरोधी पक्षाची भूमिका वठवताना दिसत नाही. त्यामुळे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून काही नगरसेवकांची नुकतीच झाडाझडती घेतली. त्याचप्रमाणे, सोमवारी सर्वच नगरसेवकांना मुंबईस बोलविण्यात आले आहे. सध्या विनायक खैरे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. मात्र, तेदेखील विरोधकाची भूमिका आक्रमकपणे बजावत नसल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कविता कर्डक, सुनीता निमसे, विक्रांत मते, शिवाजी चुंभळे आणि स्वीकृत नगरसेवक सचिन महाजन यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.