आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा; खासदार शिवाजीराव पाटील यांनी दिला मंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ध्येय समोर ठेवा, त्या प्रत पोचण्यासाठी नियोजन करा आणि त्या अनुरूप वाटचाल करा तरच यशस्वी व्हाल, असा मंत्र खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शुक्रवारी येथे तरुणांना दिला.

येथील संदीप पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्टर्न रिजन कॉन्फरन्सला प्रारंभ झाला. या वेळी पाटील यांना यशोकीर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले. कॉन्फरन्सच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया व पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची प्रमुख उपस्थिती होती. सीएसआय रिजनचे अध्यक्ष चंद्रशेखर सहस्रबुद्धे, र्शीकांत करोडे, अविनाश शिरोडे, संदीप फाउंडेशनच्या जीएम मोहिनी पाटील, प्रा. पी. आय. पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. एस. टी. गंधे आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.

पाटील यांनी आपली यशोगाथा या वेळी मांडली. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दर पाच वर्षांचे नियोजन व लक्ष्य निश्चित केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्त सरंगल यांनी सायबर क्राईमविषयक कार्यशाळांना पोलिसांना आवर्जून बोलवावे, असे आवाहन केले. दरम्यान, कॉम्प्युटर सोसायटीच्या नाशिक चॅप्टरने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. शिरोडे यांनी प्रास्ताविक केले. सीएसआय नाशिकच्या उपक्रमांची माहिती अपूर्वा जाखडी यांनी दिली. प्रा. सुनील कुटे, चंद्रशेखर डहाळे, नीलेश अलोणे यांनी परिचय करून दिला. प्रा. प्राजक्ता विसपुतेंनी सूत्रसंचालन केले. मंगेश शिसोळकर यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर टेक्निकल सेशनमध्ये ‘ब्रिंग युअर ओन डिव्हाईस’ या नव्या संकल्पनेवर डॉ. प्रदीप पेंडसे यांनी विचार मांडले. इएसडीएसतर्फे डेटा सेंटरविषयी माहिती देण्यात आली. एमकेसीएलचे अजित जगताप यांनी मशीन ट्रान्सलेशन याविषयी, एअरटेक टेक्नॉलॉजीचे सागर जावखेडकर यांनी मोबाइल अँप्सविषयी आणि के. राजीव टाटा यांनी टेक्नॉलॉजी क्लाउड अँप्लिकेशन याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली.