आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Supriya Sule At Nashik, Latest News In Marathi

सुप्रिया सुळे म्हणतात...संसदेत आम्ही कधीकधी साड्यांवरही चर्चा करतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संसदेत गंभीर मुद्द्यांवर प्रदीर्घ आणि नीरस भाषणे होतात त्या वेळी कधीकधी एकमेकींच्या साड्यांवरही चर्चा करतो, अशी दिलखुलास गप्पा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मारल्या.

एका कार्यक्रमात सुप्रिया म्हणाल्या, ‘तुम्ही लेक्चरच्या वेळी बोअर होता. त्या वेळी तुम्ही दीपिका पदुकोण बाजीराव-मस्तानीमधील तिच्या लुक्सविषयी बोलत असाल. आम्हीही संसदेत कधीतरी असे करतो. एकसारखी भाषणे एेकून कंटाळा आला तर आम्ही इतर मुद्द्यांवर चर्चा करतो. मी संसदेत जाते. पहिले भाषण ऐकते. मग दुसऱ्या, तिसऱ्या,चौथ्या भाषणात तेच तेच मुद्दे येतात. त्यामुळे कधीकधी डुलकीही लागते किंवा शेजारच्या खासदाराशी गप्पा मारतो. तुमची साडी कुठून आणली, माझी कुठून आणली अशीही चर्चा होते. तुम्हीही अशा गप्पा मारता ना?