नाशिक - पर्यावरण दिनी शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून १९,२१२ नाशिककरांनी हाती खराटे, फावडे घेऊन गाेदावरी, नासर्डी व वाघाडी नदीच्या स्वच्छतेची स्तुत्य मोहीम राबवली. २६ प्रशासकीय विभागांनी ही माेहीम हाती घेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले हाेते. साेशल मीडियावरूनही मोहिमेचा प्रचार झाला होता. जेसीबी, राेबाेटच्या साह्याने नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, महापौर अशोक मुर्तडक या मोहिमेत होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवलेही सपत्नीक पात्रात स्वच्छतेसाठी उतरले.
३७४ मे. टन कचरा
मोहिमेत ३७४ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. अजूनही २०० मेट्रिक टनपेक्षा अधिक कच-याचे ढीग पडून आहेत. दोन दिवसांत त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यापुढेही मोहीम सुरू राहणार असून, गोदाकाठी पोलिसांचा पहारा राहणार आहे.