आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एमपीएससी’चे सर्व्हर पुन्हा डाऊन; परीक्षा शुल्क भरण्‍यास मुदतवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने पोलिस उपनिरीक्षक पदाच्या पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या व परीक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ 10,486 ग्रामीण व 1,336 शहरी विभागांत पोहोचवण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
25 ऑगस्टला होणार्‍या पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेचे अर्ज सादर करण्याची तारीख या तक्रारींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. डेबिट कार्ड, नेट बँकिंग व ‘सीएससी’द्वारे पैसे भरण्याची मुदत 5 ऑगस्टऐवजी ८ ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर स्टेट बँकेद्वारे चलन भरण्याची तारीख 12 ऑगस्ट करण्यात आली आहे. एकाच वेळी अनेकांनी या संकेतस्थळाचा वापर केल्यास सर्व्हरवर अतिताण येऊन संकेतस्थळ बंद होणे, त्याचा वेग कमी होणे अशा तक्रारी वारंवार येऊ लागल्या आहेत. या तक्रारी जुन्या नसल्या तरीही त्याच तक्रारी वारंवार येत आहेत.

का होते सर्व्हर डाऊन?
० डाटा सेंटरची रॅम व प्रोसेसर क्षमता मुळातच कमी.
० सर्व्हरवर डाटा स्टोअर करण्याची क्षमता कमी.
० परीक्षेच्या वेळांऐवजी सामान्य सर्फिंगच्या वेळांनुसार सर्व्हरचे नियोजन.
० जास्त क्षमतेचे प्रोसेसर 2-4 दिवसांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर नसते.

... तर होईल समस्या कमी
आयोगाने उपाययोजना केल्यास ही समस्या कमी करता येईल, असे ईएसबीई सॉफ्टवेअरचे व्यवसाय विकास मॅनेजर विशाल जोशी यांनी सांगितले.

त्यासाठी त्यांनी सुचवलेले दोन पर्याय :
० क्लाऊड कॉम्पिटिंग - ही सुविधा आयोगाने अवलंबली असून त्यात वेबसाइटच्या गरजेनुसार ऑटो स्केलिंग म्हणजेच वापरानुसार प्रोसेसरची क्षमता व रॅम वाढवतात. हा उपाय आर्थिकदृष्ट्याही परवडणारा असून सरकारी यंत्रणांसाठी सोयीस्कर समजला जातो.

०डिझास्टर रिकव्हरी साइट - या सुविधेमध्ये संकेतस्थळावरील संपूर्ण डाटा सुरक्षित ठेवला जातो, जेणेकरून संकेतस्थळावरील माहिती गहाळ अथवा त्याचे नुकसान होत नाही. गेल्या वेळी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांची माहिती नाहीशी झाली होती. हा प्रकार या सुविधेमुळे घडला नसता.