आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयाला लागली आग; महावितरणला आली जाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मंत्रालयातील आगीमुळे महावितरण कंपनी खडबडून जागी झाली असून, अशी दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. प्रकाशगड, मुख्यालयाकडे पाठवण्यात येणारे नवीन प्रस्ताव किती प्रमाणात ऑनलाइन करता येतील, याची चाचपणी सर्व परिमंडल कार्यालय स्तरावरून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या कागदपत्रांचे, फायलींचे जतन व्हावे यासाठी स्कॅनिंग करण्याचे, काय जतन करणे आवश्यक आणि काय नष्ट करता येऊ शकते याच्या याद्या तयार करण्यास सांगितले आहे. सुरुवात मंडळ विभागापासून करण्यात येणार असून, यापुढे सॉफ्टमध्ये प्रस्ताव देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नकोसे साहित्य, बंद कॉम्प्युटर, प्रिंटर्स अशा निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार-पाच जणांचा गट तयार करून त्यांना कार्यालयाची रचना, संकटकाळातील मार्ग, अग्निशमन उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश राज्यस्तरावरून देण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता प्रभाकर शिंदे यांनी दिली.