आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रा कर्ज योजना अाता पोहचणार घराघरांमध्ये..., ग्रामसभेत दिली जाणार माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; केंद्रीय अर्थमंत्रालयाने नवीन, हाेतकरू व्यावसायिक तयार होण्यासाठी अाणलेल्या मुद्रा (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रेग्युलेटरी एजन्सी) कर्ज योजनेची माहिती ऑक्टोबरच्या विशेष ग्रामसभेत दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी ‘दिव्य मराठी’च्या राउंड टेबल चर्चासत्रात दिली. त्याचे आदेशपत्र बुधवारीच काढले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने आता ही योजना घराघरांत पोहचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवव्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, तसेच छोट्या व्यवसायांच्या विस्तारासाठी ही कर्ज योजना सुरू केली आहे. तिच्या प्रसिद्धीसाठी २५ सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान विशेष अभियानही जिल्ह्यात राबविले जाणार आहे. योजनेचा तपशील, काेणत्या उद्योजक -व्यावसायिकांना तिचा फायदा होईल, कशा पद्धतीने शासन अथवा बँकांकडून मदत केली जाईल, आवश्यक कागदपत्रे, कर्जमंजुरीचे निकष यासह बारीक सारीक बाबींची माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे. अाता ही योजनाच त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे अाैचित्य साधून ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभेतच त्याची माहिती दिल्यास ती प्रत्येक घरात पोहचेल, असा आशावाद व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्याबाबत आदेश देण्याचे स्पष्ट केले.

यामुळे गरजूंनाच याेजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगत अशाच लोकांना कर्जवाटप करताना प्राधान्य द्या, असेही त्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना राउंड टेबलदरम्यान सांगितले. ‘बँकेच्या बाहेरच फलक लावा. कर्जवाटप करतानाही पारदर्शकता ठेवा. कोणाचीही अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्या,’ असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी टोल फ्री क्रमांक सुरूु करण्याची सूचनाही केली.