आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामार्गावर पुन्हा अपघात, सततच्या घटनांमुळे परिसरात चिंता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल जत्रासमोर सोमवारी सकाळी भरधाव वेगातील जीपने कारला धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी महामार्गावर नेहमी होणा-या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
वॅगन आर कार (एम. एच. 15 सी. डी. 6873) रस्ता ओलांडत असताना नाशिककडून येणा-या जीपने (एम. एच. 18 डब्लू. 6534) जोरदार धडक दिली. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारचालक जी. बाबू किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर जीपचालकाने पळून जाण्याच प्रयत्न केला. काही नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यास पाठलाग करून पकडले. आडगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार सुनील शिंदे
तपास करत आहेत.