आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल 15 जूनला होणार खुला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिककरांसाठी बहुप्रतीक्षित सेतू अर्थात मुंबई-आग्रा महामार्गावरील 5.7 कि.मी. लांबीचा सर्वात मोठा उड्डाणपूल येत्या 15 जूनला वाहतुकीसाठी खुला होणार आहे.राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडस्कर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली.


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री डॉ. तुषार चौधरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ उद्घाटनासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.


उड्डाणपुलाचा प्रवास :
* 4 जानेवारी 2010 ला काम सुरू.
* 1 जुलै 2012 प्रकल्प पूर्तीची तारीख.
* जून 2013 प्रस्तावित मुदतवाढ.
* उड्डाणपुलासाठी 172 पिलर्सचा वापर.
* पिलर्सवरील एक सेगमेंट 42 टनांचा.
* सुमारे 3,500 हजार मजूर राबले.
* 1255 दिवस काम (15/06/13 पर्यंत)
* बॅँकॉकनंतर अत्याधुनिक एक्स्ट्रा स्ट्रटेड सेगमेंट, वॉटरप्रूफ मेमरिंग रबरशिटसह तंत्रज्ञानाने समृद्ध असा हा दुसरा उड्डाणपूल.