आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai High Court News In Marathi, Govdavari River Pollution, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरी प्रदूषणाबाबत 30 जूनपर्यंत माहिती द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे जिल्हा प्रशासनाला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती भाविक येतील, भाविकांसाठी स्वच्छतागृहांसह काय उपाययोजना करण्यात आल्या आहे, मलनिस्सारण केंद्र कधीपर्यंत सुरु होईल ? यांच्यासह सिंहस्थात वाहतुकीचे नियोजन कसे करणार? याची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासकीय अधिका-यांना दिले.

गोदावरी प्रदूषणासंदर्भात गटारीकरण विरोधी मंचाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय ओक व न्या. जे. जे. चांदूरकर यांनी प्रशासकीय अधिका-यांना अनेक प्रश्नांची विचारणा केली. कुंभमेळ्यासाठी 70 ते 80 लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

त्यावर न्यायालयाने एवढ्या मोठ्या प्रमाणात येणा-या भाविकांसाठी स्वच्छतागृहांची काय व्यवस्था केली आहे, याची माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या उपाययोजनांची माहिती असलेला अहवाल राज्य शासनाने पालिकेकडून मागितला आहे. गंगापूर व पिंपळगाव खांब येथे प्रस्तावित मलनिस्सारण केंद्र केंव्हापर्यंत सुरू होईल आणि सिंहस्थात वाहतुकीचे काय नियोजन केले आहे, याची माहिती जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने 30 जूनपर्यंत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य शासन यांच्याविरोधात राजेश पंडित व निशिकांत पगारे यांनी ही याचिका दाखल केली आहे.