आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन व्हाया अाैरंगाबाद-नाशिक, राजधानी ते उपराजधानी 2 तासांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्याच्या अर्थिक राजधानीला उपराजधानीशी जाेडण्यासाठी प्रस्तावित असलेला मुंबई-नागपूर समृद्धी सुपर एक्स्प्रेस वे शेजारीच जागा ताब्यात घेऊन त्यावर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार अाहे. त्यासाठी स्पेनच्या दाेन कंपन्यांकडून सविस्तर प्रकल्प अाराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले अाहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन हाेत अाहेच; शिवाय बुलेट ट्रेनसाठीही जागा मिळवणे शक्य असल्यामुळे हा प्रस्ताव व्यवहार्य ठरेल, असे प्रथमदर्शनी दाेन्ही कंपन्यांनी मान्य केले अाहे. संबधित कंपन्यांनी चार वेळा प्रत्यक्ष पाहणी करून तयार केलेला अहवाल ३० अाॅगस्ट राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-नागपूर केवळ दाेन तासांत गाठणे शक्य हाेणार अाहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा भाजप सरकारचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. या महामार्गामुळे मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी जेमतेम सात ते अाठ तास लागतील. सद्य:स्थितीत समृद्धी महामार्गासाठी माेठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया केली जात असून ज्या अाठ जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार अाहे तेथील शेतकऱ्यांबराेबरच जागा अधिग्रहणासाठी बैठकाही सुरू अाहेत.
पुढील स्लाईडवर वाचा....हे असतील संभाव्य थांबे... अशा सुरु आहेत घडामोडी....विमानापेक्षा परवडेल प्रवास... वेळेची होईल बचत...
बातम्या आणखी आहेत...