आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत धो-धो पाऊस; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मुंबईत रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. भुसावळकडे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गीतांजली, पुष्पक, हरिद्वार व काशी या एक्स्प्रेस दीड ते दोन तास, तर मुंबईकडे जाणार्‍या महानगरी, पटना सुपर एक्स्प्रेस दोन व अडीच तास उशिराने धावत होत्या.

पावसामुळे रुळावर पाणी साचल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे इतर गाड्यांनाही स्थानकावर पोहचण्यास उशीर होत होता.

बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठी..
स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यातच नागरिकांकडून वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने ते रोखण्यासाठी स्टेशन चौकीपासून स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा काही अंतर सोडून दोर बांधण्यात आला आहे. यामुळे रुंद रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावर वाहतूकही ठप्प होत असल्याने सोमवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेत वाहनचालकांमध्ये वाद झाले.